नाराज धनंजय मुंडेंना खुश करण्याचा भाजपचा प्रयत्न

October 10, 2009 8:41 AM0 commentsViews: 5

10 ऑक्टोबर परळी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं उमेदवारी नाकारलेले धनंजय मुंडे सध्या प्रचारात बिझी आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याच शैलीत सभा गाजविणारे धनंजय मुंडे सध्या अस्वस्थ असले तरी भाजप त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी मी कशाचाही त्याग करू शकतो, अशी मार्मिक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली.

close