नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये अंधा कानून!

April 3, 2015 1:28 PM0 commentsViews:

03 एप्रिल : नागपूरमधल्या सेंट्रल जेलमधून पाच कैदी पळाले आणि या जेलच्या कारभाराविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं उपस्थित झालं. नागपूरच्या सेंट्रल जेलचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. या व्हिडियोमध्ये या जेलमध्ये नियमांचं कसं सर्रास उल्लंघन होतं, हे दिसतं आहे.

नियमाप्रमाणे एकाच गुन्ह्यातल्या कैद्यांना एकाच बराकीमध्ये ठेवता येत नाही. मात्र या जेलमध्ये सर्व कैद्यांना एकाच बराकीमध्ये ठेवले जात असल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट होतं आहे. इतकंच नाही तर कुख्यात गुन्हेगार जेलच्या बराकीमध्ये सिगारेट ओढताना आणि मोबाईलचा वापर करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी (मंगळवारी) या जेलमधून 5 आरोपी फरार झाले होते. त्यानंतर नागपुरच्या जेलमध्ये सिगरेट, दारु, मोबाईल अशा गोष्टी सर्रास अधिकार्‍यांकडून पुरवल्या जात असल्याचं जेलचे शिपाई व्हिसलब्लोअर विजय गवई यांनी IBN लोकमतशी बोलताना सांगितलं होतं. नागपुरच्या या जेलमध्ये महत्वाच्या गुन्ह्यांमधले कैदी आहेत. पण कैद्यांना मिळणार्‍या सुविधांचा पर्दाफाश या व्हिडिओ क्लिपवरून होतोय सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close