दुबईमध्ये आलेलं वाळूचं मोठं वादळ शमलं

April 3, 2015 2:22 PM0 commentsViews:

03 एप्रिल : दुबईमध्ये काल (गुरूवारी) वाळूचं मोठं वादळ आलं होतं. या वादळा मुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पण, आता हे वादळ शमलं असून आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतं आहे.

दुबईच्या आकाशात काल वाळूचे प्रचंड लोट दिसत होते. त्यामुळे समोरचं दिसणंही फार मुश्कील झालं होतं. तसंच लोकांना श्वसनाचा त्रासही झाला. विमानसेवेलाही याचा फटका बसला. वाळूच्या वादळामुळे दुबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरून जाणार्‍या विमानांचा मार्ग बदलावा लागला. त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले.

दुबईप्रमाणेच दोहा आणि कतारमध्येही वाळुच्या वादळाचं वातावरण आहे. यापुर्वी आलेल्या वादळांच्या तुलनेत यंदाचं वादळ जास्त तीव्रतेचं होतं असल्याचं समजते. या वाळुच्या वादळाने शहरात धुमाकुळ तर घातलाच आहे पण त्याचबरोबर या वादळाने रहिवाश्यांच्या घरात शिरकाव केला आहे. तिथल्या बहुतांशी लोकांच्या घरात वाळु जमा झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close