युतीची शिवाजीपार्कवर संयुक्त सभा

October 10, 2009 8:45 AM0 commentsViews: 3

10 ऑक्टोबर राज्यातला प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. शिवसेना-भाजप युतीचा महामेळावा शनिवारी शिवाजीपार्क होणार आहे. या मेळाव्यात सेना आणि भाजपचे सर्व महत्वाचे नेते हजर असतील. पण, या मेळाव्याचे खास आकर्षण असणार आहेत ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिकांशी होणार असलेला संवाद. या महामेळाव्यात बाळासाहेब हजर राहतील असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. पण शिवसेनेचे काही नेते मात्र या वृत्ताचा इनकार करत आहेत. त्यामुळे या महामेळाव्या बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहणार का याविषयी चर्चेला उधाण आल आहे. बाळासाहेब मुलाखतीच्या माध्यामातून शिवसैनिकांशी संबोधित करतील अशी शक्यता आहे. शुक्रवारी राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेना-भाजप युतींचा महामेळावा पार पडतोय त्यामुळे राज ठाकरेंना उत्तर देण्याची नामी संधी उध्दव ठाकरे यांच्याकडे चालून आली आहे. राज ठाकरेंच्या टिकेला उध्दव ठाकरे काय उत्तर देतात देणं पाहणं मनोरंजन ठरेल. मुंबईतील शिवाजीपार्कवर युतीच्या संयुक्त सभेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सेना नेते मनोहर जोशी, रामदास कदम तर भाजपातर्फे राजनाथ सिंह, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या रॅलीत उपस्थित असतील.

close