घुमान संमेलनाचे आज सूप वाजणार

April 5, 2015 12:53 PM0 commentsViews:

Sahitya-samelan

05 एप्रिल : घुमानमध्ये सुरू असलेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज सूप वाजणार आहे. आज संध्याकाळी साडे चारच्या सुमारास या संमेलनाचा समारोप होईल. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

संमेलनाच्या आजच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी डॉ. गणेशदेवी यांची मुलाखत, तआधुनकि तंत्रज्ञान आणि मुदि्रत साहित्याचे भवितव्यय या विषयावरील परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. निमंत्रितांच्या कविसंमेलनाची पर्वणीही रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, पंजाबी बांधवांच्या पाहुणचाराने संमेलनाची गोडी अधिकच वाढली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close