आदित्य ठाकरेंचा रोड-शो

April 5, 2015 7:41 PM0 commentsViews:

 वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप – रिपाइं महायुतीने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांच्या प्रचारार्थ आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो केला. खेरवाडी मच्छी मार्केट येथून सकाळी 9.30 वाजता हा रोड शो सुरू झाला. तिथून टीपीएस मुख्य रस्त्यावरून व्ही. एन. देसाई रुग्णालयमार्गे सर्व्हिस रोड, सांताक्रुझपर्यंत हा रोड शो अयोजित करण्यात आला होता. या रोड शोदरम्यान, खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख आमदार अनिल परब, आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, शिवसेना सचिव आदेश बांदेकरही उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close