मुंबई सगळ्यांची : सोनीयांचा सेना-मनसेला टोला

October 10, 2009 1:44 PM0 commentsViews: 6

10 ऑक्टोबर मुंबई सगळ्यांचंच घर असून सार्‍या देशाची आहे असा टोला सोनिया गांधींनी शिवसेना-मनसेला मारला आहे. वांद्र्यातल्या सभेत त्या बोलत होत्या. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी सोनिया गांधींनी राज्यात तीन ठिकाणी सभा घेतल्या. कोल्हापूर, नागपूर आणि मुंबईत त्यांच्या सभा झाल्या. सोनियांनीच्या सभांमधून राष्ट्रजूटीच्या मुद्याला महत्व दिलं. तसेच आर्थिक विकासाचं उद्दीष्ट गाठायचं असेल तर सर्वांनी मतदान करुन आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहनही सोनियांनी जनतेला केलं.

close