प्रचाराच्या तोफा थंडावल्या : काही ठिकाणी हिंसक हल्ले

October 12, 2009 5:42 AM0 commentsViews: 2

12 ऑक्टोबरगेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात सुरु असलेला प्रचारसभांचा झंझावात काल थांबला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचे बडे नेते, प्रचाराचा रिंगणात होते.जाता जाता मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व पक्षांनी, आपले मोठे नेते मैदानात उतरवले.उद्धव ठाकरेंनी काल पुणे आणि मुंबईत सभा घेतल्या. तर राज ठाकरेंनी काल मुंबईत दोन सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामतीत शेवटची सभा घेतली. तर भाजपनं काल नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी या आपल्या दोन मोठ्या नेत्यांना प्रचारात उतरवलं. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेली कार्यकर्त्यांची धावपळ, आणि नेत्यांचे दौरे आता थांबलेत. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात ते 13 तारखेकडे. दरम्यान नेते, कार्यकर्ते आणि उमेदवारांनी आता बैठका आणि गुप्त खलबंतं यावर जोर देत, तोंडी प्रचारालाही सुरुवात केलीये.

close