मतदान करा, आपला हक्क बजावा

October 12, 2009 8:15 AM0 commentsViews: 7

12 ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीचा वादळी प्रचार रविवारी संपला. आता उरलाय शेवटचा दिवस. 'दाखवण्या'चा प्रचार संपलाय आणि सुरु झालाय 'खर्‍या' प्रचाराचा धमाका. म्हणजेच मतदारांना भुलवण्याचे नेटाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मतदार राजाला प्रसन्न करण्यासाठी कुणी लक्ष्मीदर्शनाचा प्रयोग लावला आहे. तर कुणाचं झकास विलायती 'दारूकाम' सुरू झालं आहे. म्हणजेच पैसे आणि दारुवाटप सुरू झालं आहे. अर्थात लपून-छपून. कोल्हापूर जिल्ह्यात तर काही उमेदवारांनी एका मतामागे 1 किलो मटण आणि चिकन दिल्याची तिखट चर्चा सध्या सुरू आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात एका मताला 500 रुपयांपासून 3 हजार रूपयांचं मोल आलं आहे. निवडणूक आयोगाच्या नजरेपासून दडून या घडामोडी सुरु आहेत. पण आम्हाला खात्री आहे, की सुजाण मतदार कसल्याही आमिषाला भुलून आपलं अमूल्य मत विकणार नाही, वाया जाऊ देणार नाही.

close