पुढचे संमेलन काश्मीरला घेतील!, भालचंद्र नेमाडे यांचा टोला

April 6, 2015 9:50 PM1 commentViews:

photo06 एप्रिल :  ‘साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग अशी टीका करत पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरलाही घेतील अशा शब्दांत ज्ञानपीठ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांनी घुमानच्या संमेलनावरूनही महाराष्ट्र साहित्य परिषदेला टोला लगावला आहे. नाशिकमध्ये गिरणा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

जात-धर्म, इतिहास आणि भाषा यासंदर्भात विवेचन करताना एक धागा पकडून नेमाडे म्हणाले की, एका मराठी प्रजातीची दहा-बारा घरे काश्मीरला असून, त्यामुळे कदाचित पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरला घेतले जाईल. साहित्य परिषदांना मराठी माणसाचा नुसता वास आला, तरी तिथे संमेलन भरवतील अशी टीक नेमाडे यांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jai Maharashtra

    Jammu Kashmir madhe zhala samelan ta tyat wait kai?

close