एक दिवस धोनीवर भीक मागण्याची वेळ येईल – योगराज सिंग

April 7, 2015 3:31 PM1 commentViews:

Yoasgraj and dhoni

07 एप्रिल : वर्ल्डकपसाठीच्या टीम इंडियामध्ये युवराजसिंगचा समावेश न केल्याने नाराज असलेले युवराजचे वडिल योगराज सिंग यांनी धोनीवर जोरदार टीका केली आहे. महेंद्र सिंग धोनी रावणासारखाच अहंकारी असून एक दिवस त्यांचा अहंकार मोडेल आणि त्याच्यावर भीक मागण्याची वेळ येईल, अशा शब्दांत योगराज सिंग यांनी धोनीवर जळजळीत टीका केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघात युवराज सिंगचा समावेश न केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. 2011 मधील वर्ल्डकपचा ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ ठरलेल्या युवराजला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्थान न मिळाल्याने महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे. युवराज सिंगचे वडिल आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी तर धोनीविरोधात मोहीमच सुरू केली आहे.

एका हिंदी न्यूजचॅनलला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांनी धोनीवर आक्षेपार्ह टीका केली. ते म्हणाले, धोनी हा रावणापेक्षाही जास्त अहंकारी आहे. त्याचा अहंकार एक दिवस मोडून पडेल आणि त्याच्यावर भीक मागायची वेळ येईल. धोनीत कोणतीही कुवत नव्हती मात्र, प्रसिद्धी माध्यमांनी त्याला हिरो बनविल्याचेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

2011 मधील वर्ल्डकपमधील फायनलमध्ये धोनी स्वत: चौथ्या क्रमांकावर उतरला व संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मग यंदाच्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर का आला नाही असा सवालही योगराज सिंग यांनी उपस्थित केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jai Maharashtra

    Murkha Mansa, Tujha asha beakkal badbadi mule Tula Team madhe kadhi ghetla nai, ani tujha Pora la pun Hakalla..Tujhi Laiki Nahiye..Bewdya

close