डोंबिवलीत तरुणाची दारुच्या बाटलीने भोसकून हत्या

April 7, 2015 12:42 PM0 commentsViews:

DOMBIVLI CRIME

07 एप्रिल : डोंबिवलीत आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास एका तरुणाची दारुच्या बाटलीने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. तो मित्रच असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

डोंबिवली पूर्व परिसरातील पांडुरंगवाडीत रस्त्यावर पहाटे तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची दारुच्या बाटलीने भोसकून हत्या केली होती. श्रेयस चारी असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्यातील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवले. चौकशीदरम्यान पोलिसांनी श्रेयसचा मित्र दशरथ पाटील याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close