नांदगावमध्ये पैसे-दारू वाटताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक

October 12, 2009 10:34 AM0 commentsViews: 6

12 ऑक्टोबर नांदगाव विधानसभा मतदार संघात लोह हिंगवे या गावात मतदारांना पैसे वाटताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेबराव पाटील यांच्यासह सातजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाखांच्या रोख रकमेसह देशी रिव्हॉलव्हर आणि दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. विरोधकांनी यावर आता कारवाईची मागणी केली आहे. रविवारी प्रचार संपल्यावर संध्याकाळी नांदगावातल्या लोह हिंगवे गावात मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन इनोव्हा ताब्यात घेतल्या. तपासणीमध्ये त्यात अडीच लाख रोख रकमेसह देशी पिस्तुल आणि दारूचे बॉक्सही सापडले आहेत. नांदगावमधून छगनराव भुजबळांचा मुलगा पंकज राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे पोलिसांवर चांगलाच ताण आहे. शिवसेना उमेदवार संजय पवार यांनी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. नेते या घटनेचं राजकारण करणारच मात्र घडलेल्या घटनेमुळे मतदार संघात मोठ्या प्रमाणात पैसा आणि दारूवाटप होत असल्याचं उघड झालं आहे.

close