धोम गावानं टाकला मतदानावर बहिष्कार

October 12, 2009 10:37 AM0 commentsViews: 4

12 ऑक्टोबर सातारा जिल्ह्यातल्या धोम गावानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस इन्स्पेक्टर चंद्रशेखर देशमुख यांचं पार्थिव आणताना प्रशासनानं हलगर्जीपणा दाखवला. त्याच्या निषेधार्त गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना चंद्रशेखर देशमुख यांना वीरमरण आलं होत. पण हेलिकॉप्टर्स नेत्यांच्या प्रचारात अडकले होते. त्यामुळे शहीद झालेल्या पोलिसांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले. कारण हेलिकॉप्टर नेत्यांच्या प्रचारात अडकलं होतं. त्यामुळे धोम गावातवल्या नागरीकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. शहीद चंद्रशेखर यांच्या वडीलांनी आपला राग प्रशासनावर व्यक्त करत हेलिकॉप्टरचे पैसे त्यांनीच दिल्याची माहिती दिली आहे. साधारण 1200 ते 1300 लोकसंख्या असलेल्या या गावाने मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर कोणीही प्रशासकीय अधिकारी फिरकला नाही.

close