केळकर अहवालावरून विधानसभेत उफाळला प्रादेशिक वाद

April 7, 2015 9:44 PM0 commentsViews:

07 एप्रिल : डॉक्टर केळकर समितीच्या अहवालावरून विधानसभेत प्रादेशिक वाद उफाळला आहे. विदर्भातले भाजप आमदार अनिल बोंडे यांनी तालुका घटकांचा उल्लेख केला. त्यावर पश्चिम महाराष्ट्रातले जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जत, माण, खटाव हे पश्चिम महाराष्ट्रातले तालुके मागासलेले आहेत हेही लक्षात घ्यावे, अशी बाजू मांडली. त्यानंतर विदर्भातले भाजपचे आमदार संजय कुटे यांनी शिवतारे यांच्या मध्येच बोलण्यावर आक्षेप घेतला. पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे भारत भालके यांनीही मग या वादात उडी घेतली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close