आचारसंहितेच्या काळात 1 कोटी 85 लाखांची दारू जप्त

October 12, 2009 11:44 AM0 commentsViews: 1

12 ऑक्टोबर आचारसंहितेच्या काळात राज्यात एकूण 1 कोटी 84 लाख 82 हजारांची दारू पकडण्यात आली आहे. याप्रकरणी 3 हजार 680 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यात शेणगाव इथे मतदारांना वााटण्यासाठी आणलेली दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दारूचे 12 बॉक्स पकडले आहेत.

close