‘आयपीएल-8’मध्ये आज मुंबई-कोलकाता आमने सामने

April 8, 2015 12:48 PM0 commentsViews:

IPL mumbai - KOLkata

08 एप्रिल : आयपीएललच्या आठव्या सीझनला आजपासून सुरूवात होत असून, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज पहिला मेगा मुकाबला रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी आठ वाजता या सामन्याची सुरूवात होईल.

सलामीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काल रात्री बॉलिवूड तारे-तारकांच्या बहारदार नृत्याने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा धुमधडाक्यात पार पाडला.

आयपीएलच्या आठव्या सीझनची सुरुवात एका ब्लॉकबस्टर मुकाबल्यानं होणार आहे. कोलकाता दोन वेळा (2012, 2014) आणि मुंबई इंडियन्स (2013) एक वेळा विजेता ठरला आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर डिफेण्डिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला आव्हान द्यायला मुंबई इंडियन्सची टीम सज्ज झाली आहे. त्यात या सीझनमध्ये रिकी पॉण्टिंग मुंबई इंडियन्सचा कोच आहे, त्यामुळे त्यांच्याकडून  खूपच अपेक्षा वढल्या आहे. कोलकात्याची टीम ही डिफेण्डिंग चॅम्पियन आहे. त्यातच त्यांचा हुकमी एक्का सुनील नरीनंही या स्पर्धेत खेळणार आहे.  त्यामुळे वर्ल्डकपनंतर लगेचंच सुरू झालेल्या आयपीएलचा पहिलाच मेगामुकाबला कमालीचा रंगणार यात शंका नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close