आयपीएल-8चं ‘स्टार’ ओपनिंग

April 8, 2015 11:56 AM0 commentsViews:

‘सिटी ऑफ जॉय’ म्हणजेच कोलकातामध्ये आयपीएलच्या आठव्या सीजनचा उद्घाटन सोहळा काल (मंगळवारी) पार पडला. पावसामुळे तब्बल दिड तास वाया गेला असला तरी चाहत्यांचा उत्साह मात्र कायम होता. आयपीएलच्या आठ कॅप्टन्सनी एमसीसीची प्रतिज्ञा घेत स्पर्धेत खेळ भावनेनेच खेळण्याची ग्वाही दिली, तर दुसरीकडे बॉलीवूडच्या तारेतारकांनी एक से बढकर एक असे परफॉमन्स दिले. ह्रतीक रोशन, शाहिद कपूर, फरहान अख्तर आणि अनुष्का शर्मा यांनी बॉलीवूडमधील गाण्यांवर दमदार डान्स सादर केला. कोलकात्याचे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांनीही आपल्या गाण्यांच्या तालावर प्रेक्षकांना थिरकायला लावले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close