मुख्यमंत्र्यांचे समर्थक अडचणीत : पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल

October 12, 2009 11:47 AM0 commentsViews: 1

12 ऑक्टोबर नांदेडमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक ओमप्रकाश पोकर्णा अडचणीत सापडले आहेत. ओमप्रकाश पोकर्णा यांच्या तीन कार्यकर्त्यांवर पैसेवाटपप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख गणेश बाबुराव हारकरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ओमप्रकाश पोकर्णा नांदेड दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. पैसेवाटप करताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी वापरलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात 1 लाखांची रोख रक्कम सापडली आहे.

close