अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण प्रदान

April 8, 2015 1:57 PM0 commentsViews:

08 एप्रिल : हिंदी चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल बॉलिवूडचे शहेनशहा अभिनेते अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्काराने आज (बुधवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं आहे.

राष्ट्रपती भवनात आज झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवरांसह बच्चन कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमात परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर, ‘मायक्रोसॉफ्ट’चे प्रणेते बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांना पद्मभूषण, तर जागतिक किर्तीचे गणिततज्ज्ञ मंजूळ भार्गव, निती आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 9 पद्मविभूषण, 20 पद्मभूषण आणि 75 पद्मश्री अशा एकूण 104 पद्म सन्मानांची घोषणा करण्यात आली होती. यंदाच्या पद्म पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी देशांमधील तब्बल 16 परदेशी नागरिकांचाही या पुरस्कार्थींच्या यादीत समावेश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close