अहमदनगरमध्ये भरलं डांगी बैलांचं प्रदर्शन

April 8, 2015 7:29 PM0 commentsViews:

08 एप्रिल : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात खिरवरे गावात डांगी बैलांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांपासुन हे प्रदर्शन भरवण्यात येतं आहे. या प्रदर्शनात डांगी गाय आणि बैलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते. तसंच बळकट जनावरांच्या स्पर्धाही होतात. या स्पर्धेत सर्वात चांगल्या गाय आणि बैलाची निवड करण्यात येते. डांगी बैलांचं वैशिष्ठ्य म्हणजे या जातीच्या बैलाची त्वचा तेलकट आणि शरीर काटक असतं. त्यामुळे डांगी जातीचे बैल, चिखल आणि पाण्यातही जास्तवेळ काम करु शकतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close