युती सरकार टिकावं ही तर पवारांची इच्छा – रावसाहेब दानवे

April 8, 2015 8:04 PM0 commentsViews:

Raosaheb_Danve08 एप्रिल : शिवसेना-भाजप सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच. खुद्द शरद पवार यांच्या मनातही हीच इच्छा आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या की शिवसेना-भाजप युती सत्तेत राहणार नाही. त्यामुळे दोन-अडीच वर्षात राज्यात पुन्हा निवडणुका होतील,’ असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वर्तवले. त्याला दानवेंनी उत्तर दिलं.

भाजपचं सरकार चालू नये, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाण्यात देव घालून बसले आहेत. पण भाजप- शिवसेना एकत्र काम करून, पूर्ण पाच वर्षे पूर्ण करेल, यात कोणतीही शंका नाही. विरोधक हे रोज बोलतायत पवारांनाही हे माहिताय, त्यांच्या मनातही आहे की हे सरकार पाच वर्षे पडू नये, कारण निवडणुकींना कोणीच तयार नाही, असं दानवे म्हणाले. असं दानवे म्हणाले.

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत नारायण राणे यांच्या प्रचारासाठी काल शरद पवारांनी सभा घेतली. या सभेत पवारांनी लवकरच सरकार पडेल अशी भविष्यवाणी केली. ज्यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होईल त्यावेळी सेना-भाजपची सत्ता राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. नारायण राणे दिसायला लहान असले तरी कर्तृत्वाने महान आहेत, असं पवार म्हणालेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close