सांगलीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

October 12, 2009 1:38 PM0 commentsViews: 1

12 ऑक्टोबर मिरज दंगलीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सांगली जिल्ह्यात सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी मतदानासाठी निर्भयपणे घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हाधिकारी शाम वर्धने आणि जिल्हा पोलीसप्रमुख कृष्णप्रकाश यांनी केलं आहे. गणपतीच्या काळात अफझल खानाची कमान उभारण्यावरून दोन गटात उसळलेल्या दंगलीमुळे जिल्ह्यातल्या कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पण मतदानादरम्यान जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या कठोर उपाययोजना केल्या असून, एकूण 67 संवेदनशील मतदानकेंद्रांवर पॅरामिलिटरी फोर्सचे जवान तैनात केले जाणार आहेत. 3000 पोलीस कर्मचारी निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. तर अर्ध सैनिक बलाच्या 6 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 1110 स्पेशल पोलीस ऑफिसर्स, 750 होमगार्ड्स तैनात करण्यात आलेत. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 3000 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

close