राज्यात मतदानाला उत्साहात सुरुवात

October 13, 2009 4:34 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर राज्यभरात मतदानाला ऊत्साहात सुरुवात झाली आहे. कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री सुशिल कुमार शिंदे, आमदार राजेंद्र दर्डा यांनी मतदान केलं. सकाळीच जवळपास सर्वच पक्षाचे नेते मतदानासाठी बाहेर पडले. अजित पवार यांनी बारामतीत मतदान केलं. तर पूनम महाजन यांनी वरळीत मतदान केलं. गणेश नाईक यांनी ऐरोलीत मतदानाचा हक्क बजावला. तर मनसेचे उमेदवार वसंत गीते यांनी नाशिकमध्ये मतदान केलं. अनिल अंबानी यांनी सकाळीच जॉगिंगच्या वेषातच मतदान केलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 3559 उमेदवार रिंगणात आहेत, यंदा रिंगणात 211 महिला उमेदवार आहेत. मतदान केंद्रांची संख्या 82,028 असून एकूण 7 कोटी 56 लाख 34 हजार 525 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. औरंगाबाद पूर्व मधून सर्वात अधिक 28 उमेदवार तर सर्वात कमी डहाणू आणि इस्लामपूर मध्ये प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. चिंचवड हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मध्ये 391644 मतदार आहेत. तर कुडाळ हा सर्वात लहान मतदारसंघ 186185 मतदार आहेत.

close