1993 मुंबई बॉम्स्फोटातील दोषी याकूब मेमनची फाशी कायम

April 9, 2015 12:06 PM0 commentsViews:

yakub 1993 Accussed

09 एप्रिल : 1993 मुंबई बॉम्स्फोटातील दोषी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. फाशीला स्थगिती देण्यासाठी मेमनने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली.

1993 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा बळी गेला होता. तर 713 जण गंभीर जखमी झाले होते. याकुबने दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे तसंच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवणार्‍या इतर आरोपींनाही मदत केल्याचे तपासात निष्पन्न झालं होतं. टाडा कोर्टाने 2007 मध्ये याकुबला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर त्याने या निकालाविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली. पण सुप्रिम कोर्टानेही टाडा कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं आहे.

याकूब हा 1993च्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार आणि प्रमुख आरोपी मुश्ताक ऊर्फ टायगर मेमन याचा भाऊ आहे. टायगर मेमन सध्या फरार आहे. तर याकूबला 1994 मध्ये काठमांडू विमानतळावरून अटक करण्यात आली होती. गेल्या 20 वर्षांपासून तो नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close