26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वीच्या सुटकेचा मार्ग मोकळा

April 9, 2015 5:34 PM0 commentsViews:

lakhvi-1

09 एप्रिल : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वी याला तुरुंगातून सोडण्याचे आदेश पाकिस्तानमधील कोर्टाने आज (गुरुवारी) दिले आहेत. लख्वीला तुरुंगात ठेवण्याचा आदेश फेटाळत पाकिस्तानच्या कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे. त्यामुळे लख्वीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

लख्वीच्या विरोधात जी गुप्त कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यात आले, ते लख्वीला तुरूंगात ठेवण्यासाठी पुरशी नाहीत. त्यामुळे त्याची तुरूंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश  कोर्टाने दिले. लख्वीच्या वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळपर्यंत तो तुरूंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

झकीउर रहेमानला सोडून देण्याचं पाक कोर्टाचा निर्णय दुदैर्वी असून अशा दहशतवाद्यांना खुलं सोडू नका, असं आवाहन भारत सरकारने पाकिस्तान सरकारला केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close