विधानसभेत पाण्याचा मुद्दा पेटला!

April 9, 2015 4:24 PM0 commentsViews:

09 एप्रिल : नाशिकचं पाणी गुजरातला वळवण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप करत विरोधकांनी आज विधानसभेत खडाजंगी चर्चेला तोंड फोडलं. छगन भुजबळांनी बॅनर घेऊन विधानसभेच्या वेलमध्ये ठिय्या आंदोलन केलं. नार-पार आणि पिंजाळ खोर्‍यातल्या पाणीवाटपाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भुजबळ यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी केली. मराठवाडा आणि खान्देशावर अन्याय करून गुजरातला पाणी वळवायला राज्य सरकारनं तयारी दाखवल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबतचं सादरीकरण सभागृहासमोर करावं,अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आज दुपारी चार वाजता सादरीकरण करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close