‘आयपीएल’वर पुन्हा फिक्सिंगचं सावट, राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला खुली ऑफर

April 10, 2015 1:32 PM0 commentsViews:

RAJSATAN ROYAL
10  एप्रिल : दोन वर्षांपूर्वी झालेल्या मॅच फिक्सिंगप्रकरणामुळे विवादात सापडलेल्या इंडियन प्रिमिअर लिगच्या (आयपीएल) आठव्या सीजन सुरू होताच पुन्हा एकदा फिक्सिंगचं सावट घोंगावू लागलं आहे. राजस्थान रॉयल्स संघाच्या एका खेळाडूला रणजी ट्रॉफीदरम्यान आपल्याला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. याप्रकरणी त्या खेळाडूने बीसीसीआयच्या ऍन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती. आता यावर बीसीसीआय काय पाऊल उचलते हे पहावे लागेल.

आयपीएल 8 मध्ये आजच ‘राजस्थान रॉयल्स’चा पहिलाच सामना ‘किंग्स इलेव्हन पंजाब’विरोधात रंगणार असून, त्या पार्श्वभूमीवर आलेल्या या बातमीने खळबळ माजली आहे. राजस्थान रॉयल्स संघातील हा खेळाडू मुंबईस्थित असून त्याला रणजी सामन्यादरम्यान सहकार्‍याने ही ऑफर दिली. मात्र त्या खेळाडूने ही ऑफर नाकारत एका वरिष्ठ अधिकार्‍याला माहिती दिली आणि त्यांनी तडक ऍन्टी करप्शन अँड सिक्युरिटी विभागाकडे तक्रार नोंदवली.

रणजी सामन्यादंरम्यान आपण ‘त्या’ खेळाडूसोबत ड्रेसिंग शेअर करत होतो. त्याने जेव्हा आपल्याला प्रथम फिक्सिंगची ऑफर दिली , तेव्हा तो मजा करत असावा असं मला वाटलं होते, असं त्या खेळाडूने चौकशी दरम्यान सांगितलं. पण ठरवून खेळी केल्यास त्यातून मिळणार्‍या पैशाचा विषय निघताच ती ऑफर सीरिअस असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि त्यानंतर आपण संघ व्यवस्थापनाकडे त्यासंदर्भात माहिती दिल्याचं ही राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूने सांगितले.

दरम्यान, 2013 मधील आयपीएलच्या सामन्यांवेळी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवरून एस. श्रीशांत याला अटक करण्यात आली होती. ‘बीसीसीआय’च्या माजी अध्यक्ष एन. श्रीनिवास यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यावरील बेटिंगचे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close