राज्यातील लहान गाड्यांसाठी 53 टोलनाक्यांवर टोलमाफ, 12 टोलनाके बंद

April 10, 2015 4:09 PM0 commentsViews:

10 एप्रिल : राज्यातील 12 टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आणि 53 टोलनाक्यांवर लहान वाहनांना आणि एसटी महामंडळाच्या बसेसना टोलमाफ करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत ही घोषणा करत राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करण्याचे आश्वासन आपापल्या जाहीरनाम्यांतून देत विधानसभा निवडणुकीत मत मिळवली होती. पण सत्तेत आल्यापासून टोलमुक्ती बाबत राज्य सरकारने काहीच पावले उचलली नव्हती. यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर सातत्याने टीका होत होती. या टीकेला चोख उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी टोलने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना आज आशेचा किरण दाखवला. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे नव्या टोलधोरणाची घोषणा केली. यानुसार राज्यातील एकून 65 टोलनाक्यांमधून वाहनचालकांची सुटका होणार आहे.

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 38 पैकी 11 टोलनाके आणि रस्ते विकास महामंडळाकडील 53 पैकी एक टोलनाका असं 12 टोलनाके बंद करण्यात येणार आहेत. कोल्हापूरमधील टोलनाके बंद करण्यासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यावर 31 मेपर्यंत सकारात्मक निर्णय घेऊ, असंही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close