ऐरोली मतदारसंघात दोन गटात हाणामारी

October 13, 2009 6:12 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर ऐरोली मतदारसंघात दोन गटात हाणामारी झाली आहे. समशुद्दीन शेख नावाच्या एका कार्यकर्त्यावर तलवारीने वार करण्यात आलेत. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनेचे विजय चौगुले आणि राष्ट्रवादीचे गणेश नाईक आमने सामने आले. त्यामुळे थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. इथे पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे.

close