आता मुंबईतील डबेवाले घेऊन येणार ‘फ्लिपकार्ट’चा माल

April 10, 2015 4:26 PM0 commentsViews:

dabbewala

10 एप्रिल : मुंबईचे ‘मॅनेजमेंट गुरू’ डबेवाले रोज हजारो नोकरदारांना ठरल्या वेळी जेवणाचे डबे अचूकपणे पोहचवतात. त्याच्या या नेटवर्कचा वापर करत आता ऑनलाईन शॉपिंगसाठी जगप्रसिद्ध असणारे ‘फ्लिपकार्ट’ आपला माल ग्राहकांपर्यंत पोहचवणार आहेत.

ऑनलाईन रिटेल क्षेत्रात सध्या फ्लिपकार्ट आघाडीवर आहे. पण स्नॅपडील आणि ऍमेझॉन सारख्या कंपन्यांची स्पर्धा आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपन्या वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. वाढत्या स्पर्धेचा विचार करता फ्लिपकार्टने मुंबईच्या डबेवाल्यांच्या एका युनियनशी करार केला आहे. यांतर्गत फ्लिपकार्टच्या ‘ई-कार्ट लॉजिस्टिक्स’ या डिलिव्हरी नेटवर्कसोबत डबेवाले काम करणार आहेत. डबेवाले रोजचे डबे घेताना फ्लिपकार्टच्या वितरण केंद्रातून फ्लिपकार्टचा माल घेऊन तो ग्राहकांपर्यत पोहचवणार आहे.

दरम्यान, या कराराबद्दल फ्लिपकार्टच्या ‘लास्ट माइल डिलिव्हरी’ विभागाचे संचालक नीरज अगरवाल यांनी आनंद व्यक्त केला. ‘डबेवाला हा मुंबई शहरातील सर्वात विश्वासार्ह घटक आहे. मुंबईतील डबेवाले सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करून गेली तब्बल 120 वर्षे टिकून आहे. ते ही कोणत्या कागदपत्रांशिवाय. तसंच प्रशासकीय काम नसल्याने कमी खर्चामध्ये कशाप्रकारे व्यवसाय करावा यासाठी डबेवाले , असं फ्लिपकार्टने म्हटलं आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आम्ही त्यांच्याशी सहकार्य करार केला असून त्यामुळे आमची वितरण क्षमतेत मोठी सुधारणा होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close