गडचिरोलीत नक्षलवादी हल्ले

October 13, 2009 6:24 AM0 commentsViews: 11

13 ऑक्टोबर गडचिरोली जिल्ह्यातल्या बोरगाव मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. मतदान केंद्रातल्या कर्मचार्‍यांवर त्यांनी गोळीबार केला. गडचिरोलीत अतिरिक्त सुरक्षा दल हेलिकॉप्टरने पाठवण्यात आली आहे. गडचिरोलीतल्या कोरची तालुक्यातही पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु आहे. गडचिरोलीत 8ऑक्टोबरला नक्षलवाद्यांच्या हल्यात 17 पोलीस शहीद झाले आहेत. लाहीरी पोलीस ठाण्याजवळील ही घटना घडली होती. सुमारे शंभर सशस्त्र नक्षलवाद्यांनी या पोलिसांवर हल्ला केला. निवडणुका उधळून लावण्यासाठी नक्षलवादी हल्ला होण्याची शक्यता अनामी रॉय यांनी वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर गडचिरोली मध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

close