छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात एसटीएफचे 7 जवान शहीद

April 11, 2015 6:20 PM0 commentsViews:

naxal 2

11  एप्रिल : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर केलेल्या हल्ल्यात सात जवान शहीद झाले असून 11 जवान जखमी झाले आहेत.

सुकमा जिल्ह्यातील पिडमेलपारा येथे विशेष तपास पथकाचे (एसटीएफ) जवान नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबवत होते. ही शोध मोहीम सुरू असतानाच मोठ्या संख्येने आलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसटीएफचे मोठे नुकसान झाले. चकमक अद्याप सुरु आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close