राज्यात सकाळी अकरा पर्यंत सरासरी अठरा टक्के मतदान

October 13, 2009 7:31 AM0 commentsViews: 3

13 ऑक्टोबर राज्यभरात पहिल्या दोन तासात 7.5 टक्के मतदान झालं. जिल्हावार मतदानची सरासरी आठ टक्के आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 12 टक्के मतदान झालं आहे. ठाणे जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत 5.41 टक्के मतदान झालं. ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वधिक 24 विधानसभा मतदार संघ आहेत. पुणे जिल्ह्यातही अकरा वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान झालं. तर सोलापूर जिल्हयात 6 टक्के, सातार्‍यात 8.5 टक्के, तर रायगडमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत 15 टक्के मतदान झालं. धुळे 18 टक्के मतदान पहिल्या दोन तासात झालंय. जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघात सरासरी 7.2 टक्के मतदान झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 वाजेपर्यंत 8.3 टक्के, जालन्यात 6 टक्के, गडचिरोलीत पहिल्या दोन तासात 7.7 टक्के मतदान झालं आहे. गडचिरोलीत दोन ठिकाणी नश्रलवाद्यांनी हल्ले केले. विदर्भात नागपूरमध्ये 7.45 टक्के, वर्धा 9.3, गोंदीया 13, भंडारा 6.66, भंडारा 6.67 तर अमरावती सरासरी 8 टक्के मतदान झालं आहे. अकोल्यात आतापर्यंत 14.8 तर उस्मानाबाद जिल्हयात सकाळी साडे अकरापर्यंत 20.2 टक्के मतदान झालं आहे.

close