मुंबईतील किंग सर्कलजवळ वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

April 13, 2015 12:42 PM0 commentsViews:

Container

13  एप्रिल : मुंबईतील किंग्स सर्कलजवळ रेल्वे पुलाखाली अडकलेल्या ट्रेलरला हलवण्यात अखरे यश आलं आहे.काही काळातच इथली वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, मुंबईतील किंग सर्कलजवळ सकाळी साडे आठच्या सुमारास एक मोठा ट्रेलर अडकल्याने मुंबईकडे जाणार्‍या वाहनांची मोठी कोंडी झाली होती.

गेल्या तीन ते साडे तीन तासापासून सायन परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ट्रेलर पुलाखाली अडकल्याने तो बाजूला करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. परिणामी दक्षिण मुंबईकडे जाणार्‍या मुंबईकरांचे चांगलेच होल होत असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही काळातच इथली वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close