मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर टीकेची झोड

April 13, 2015 2:33 PM0 commentsViews:

shivsena muslims

13  एप्रिल : देशातील मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा अशी वादग्रस्त मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी या मागणीवरुन शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. संजय राऊत यांना अटक करा अशी मागणीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

सामनाच्या लेखात संजय राऊत यांनी वांद्रे पूर्व निवडणूक आणि एमआयएम नेत्यांची भाषणं याचा आधार घेत त्यांची सडेतोड मतं मांडली आहे. ‘निवडणुकीच्या रिंगणात कुणाला मुस्लिम मतं खाणारा उमेदवार असतो तर कुणाला नको असतो. ही ‘व्होट बँक’ आता चिंतेचा आणि डोकेदुखीचा विषय बनली आहे. ‘व्होट बँके’चं हे राजकारण थांबवण्यासाठी मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या असं मत राऊत यांनी मांडलं आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम आणि काँग्रेस यांनी मुसलमानांचा वापर केला पण मुस्लिमांचा विकास झालाच नाही असंही त्यांनी नमूद केले.

राऊत यांच्या लेखाचे पडसाद सोमवारीही पाहायला मिळाले. सपाचे नेते अबू आझमी यांनीही सेनेवर जोरदार टीका केली आहे. आरजेडी प्रमुख लालु प्रसाद यादव यांनीही शिवसेनेवर टीका करत अशा नेत्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असा खोचक सल्ला दिला आहे. तर संजय राऊत यांचं विधान घटनाद्रोही असल्याची टीका भाजपचे माधव भंडारी यांनी केली आहे. घटनेनुसार कुठल्याही एका व्यक्तीचा मतदानाचा अधिकार काढता येत नाही. इथे तर राऊतांनी थेट एका समुदायाचा अधिकार काढण्याची मागणी केलीये, अशी प्रतिक्रिया माधवन भंडारी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी मात्र राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. देशाची लोकसंख्या जोमात वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी सर्वांवर नसबंदी लागू करावी. देशात सर्वांसाठी कुटुंब नियोजनाचा समान कायदा असावा, आणि जे कायदा पाळणार नाही,त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला हवा अशी मागणीही साक्षी महाराजांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close