राज्यातील 37 IPS अधिकार्‍यांच्या बदल्या

April 13, 2015 7:40 PM0 commentsViews:

ÁÖðÖ‹

13 एप्रिल : राज्यातील पोलीस खात्यात आज (सोमवारी) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) 37 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची उचलबांगडी करण्यात आली असून, एस. पी. यादव हे नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत.

वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या सर्वांत महत्त्वाच्या समजल्या जातात. जे अधिकारी सध्या निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत, त्यांना निवडणुकीनंतर नव्या पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. मात्र राज्यातील कोणत्याही निवडणुकीच्या कामात व्यस्त नसलेल्यांना तातडीने नव्या पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये सर्वात महत्त्वाची बदली मानली जाते आहे. नागपूर पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची उचलबांगडी केली गेली आहे. आता एस. पी. यादव हे नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत. तर के.के.पाठक आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. आता के.के.पाठक यांच्या बदलीला उचलबांगडी म्हणायची की बढती, अशी चर्चा आता रंगली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील गुंडगिरी सातत्याने वाढतना दिसत आहे. त्यामुळे नागपूरकरांकडून प्रचंड संताप आहे. नागपूर सेंट्रल जेलचे उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांचीही उचलबांगडी करत आली असून त्यांची पोलीस सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची एटीएस प्रमुख पदावरुन उचलबांगडी करण्यात आली असून मुंबईचे सहपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे आता नवे एटीएस प्रमुख असतील. तर हिमांशू रॉय आता पोलिस हाऊसिंग अँड वेलफेअर कॉर्पोरेशनचे अतिरिक्त महासंचालक असणार आहेत. तर विश्वास नांगरे पाटील यांना विशेष पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.

पोलीस खात्यात बदल

- के.के.पाठक आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त
– एस पी यादव नागपूरचे नवे पोलीस आयुक्त
– नागपूर कारागृहाचे उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांची उचलबांगडी करत पोलिस सुरक्षा महामंडळावर नियुक्ती
– मुंबईचे सहपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर नवे एटीएस प्रमुख
– विश्वास नांगरे पाटील विशेष पोलीस महासंचालक
– सतीश चंद्र माथूर – पोलीस महासंचालक
– हिमांशू रॉय अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण खातं
– हेमंत नगराळे अतिरिक्त पोलीस महासंचालक, म्हाडा
– प्रज्ञा सरवदे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुख्य दक्षता अधिकारी सिडको
– विठ्ठल जाधव अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह, नागपूर
– धनंजय कमलाकर सहपोलीस आयुक्त अंमलबजावणी महासंचालनालय
– संदीप बिष्णोई अतिरिक्त पोलीस महासंचालक
– व्ही. डी. मिश्रा अतिरिक्त पोलीस महासंचालक आस्थापना

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close