कल्याण-डोंबिवली परिसरात नव्या रहिवाशी प्रकल्पांना मनाई!

April 13, 2015 9:53 PM0 commentsViews:

mumbai high court434

13  एप्रिल :  तुम्ही जर कल्याण-डोंबिवली परिसरात नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. कारण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही नवीन व्यावसायिक किंवा रहिवाशी प्रकल्पांना मंजुरी देण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अधिकृत-अनधिकृत बांधकामे वाढल्याने डम्पिंग ग्राऊण्ड आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित होत नसल्यामुळे नव्या प्रकल्पांना मान्यता मिळू नये, असं हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटलं होतं. त्यावरील सुनावणीत मुंबई हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीमध्ये नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळणार नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या व्यवस्थापनातील दिरंगाईबाबतही मुंबई हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून त्यांची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत महापालिका हद्दीतील व्यावसायिक प्रकल्प आणि नवीन बांधकामाना मंजुरी देऊ नये असे आदेश हायकोर्टाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली च्या बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात 2009 साली डोंबिवलीचे नागरिक कौस्तुभ गोखले यांनी जनहित याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणातली पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close