राज्यात राड्याच्या अनेक घटना

October 13, 2009 9:24 AM0 commentsViews: 5

13 ऑक्टोबर राज्यात मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी राडा झाला. अपेक्षेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणगावमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. बूथ लावण्यावरून कुडाळ मतदारसंघात ही हाणामारी झाली. त्यात दोन जण गंभीर जखमी झालेत. कुडाळ मतदारसंघातील घटना घडली आहे. दरम्यान वैभव नाईक यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवल्याचं समजतं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना रिवॉल्वर दाखवलं आहे. या मतदारसंघात नारायण राणे आणि वैभव नाईक यांचा सामना होत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरजवळ शिवसेनेच्या 9 गाड्या फोडल्या आहेत. या मध्ये 40 जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी 11जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातही काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मतदान केंद्रावरच हा प्रकार घडला.

close