गुगलकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

April 14, 2015 11:31 AM0 commentsViews:

google doodle.com14  एप्रिल :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 124वी जयंती आहे. आंबेडकरांना संपूर्ण भारतात अभिवादन केले जात असतानाच गुगलनेही त्यांना आदरांजली वाहिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीनिमित्त त्यांचे गुगल डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलवर डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलनेही त्यांना डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. भारतासह हे डुडल अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि ब्रिटन या देशांतही दिसत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close