मुस्लिमांचा मताधिकार काढा असे लिहिलेच नाही – संजय राऊतांचा यू टर्न

April 14, 2015 4:21 PM0 commentsViews:

14  एप्रिल :  मुस्लिमांचा मताधिकार काढण्याची मागणी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरू झाल्यावर, आज (मंगळवारी) राऊत यांनी यू टर्न घेतला आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढा असं  लिहिलेच नाही. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला अशी सारवासारव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी औरंगाबादमध्ये केली आहे.

‘सामना’तील रविवारच्या एका लेखात संजय राऊत यांनी ‘जोपर्यंत मुसलमानी मतांचे फक्त राजकारण होत राहील तोपर्यंत या देशातील मुसलमानांना भवितव्य नाही. म्हणूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ”व्होट बँकेची अशी सौदेबाजी रोखायची असेल तर मुसलमानांचा मताधिकार काढा” अशी मागणी केली होती आणि ते खरेच होते. ज्या दिवशी मुसलमानांचा मताधिकार काढला जाईल त्यावेळी सर्व सेक्युलरवाद्यांचे मुखवटे गळून पडतील’, असं लिहिले होतं. याच लिखाणावरून देशभरातून संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर चौफेर टीका करण्यात आली. काँग्रेस आणि इतर विरोधकांसोबतच मित्रपक्ष असलेल्या भाजपानेही राऊत यांच्या विधानाशी सहमती दर्शवली होती.

या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लिमांचा मताधिकार काढा, असं आपण थेटपणे लिहिलेले नसल्याचं सांगत मुस्लिम मताधिकाराच्या विधानावरुन घुमजाव केला आहे. मुस्लिम मतावरील अधिकार काढा तेव्हाच त्याचं राजकारण थांबेल असं मला म्हणायचे होत. मुस्लिमांचा मताधिकार काढणे हे घटनाबाह्य आहे अशी उपरतीही त्यांना झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close