मतदानादरम्यान मुंबईत 5 गुन्हे दाखल

October 13, 2009 11:40 AM0 commentsViews: 5

13 ऑक्टोबर मतदानादरम्यान मुंबईत एकुण 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन गुन्हे बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स पोलिस ठाण्यात तर दोन घाटकोपर पोलिस ठाण्यात दाखल झाले. काँग्रेसचे उमेदवार जनार्दन चांदुरकर यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला आहे. मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर चांदुरकर यांनी आपल्याला धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर मध्ये अपक्ष उमेदवार राम मारोती कदम यांच्या विरुद्ध एसएमएस करुन मतदारांची दिशाभुल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घाटकोपर मध्येच ईवीएम बदलतांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी गांेधळ घातल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाचवा गुन्हा हा बोगस मतदान करताना सांताकृझ मधील साधना कॉलेज जवळ नोंदवण्यात आला.

close