मनसे कार्यकर्त्यांचा नाना चुडासामा यांच्या ऑफिसवर हल्ला

April 15, 2015 6:37 PM0 commentsViews:

ahsfbhasbjpg

15  एप्रिल : मनसे कार्यकर्त्यांनी आज प्रसिद्ध वकील नाना चूडासमा यांच्या कार्यालजवळील बॅनर फाडला. या बॅनरवर मराठीविषयी अवमानकारक मजकूर छापल्याचं सांगत बॅनर फाडल्याचं मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ‘प्रमोटिंग मराठी वेलकम, बट डिक्टेट इज नॉट वेलकम’ (मराठीच्या प्रसाराचं स्वागत आहे, मात्र त्यासाठी करण्यात येणारी हुकूमशाही मान्य नाही), असं या बॅनरवर लिहिलं होतं. मरीन ड्राईव्हवर नाना चूडासमा यांचं कार्यालय आहे.    मनसेचे तीन ते चार कार्यकर्ते अचानक या ऑफिसवर धडकले, बॅनर्स फाडल आणि निघून गेले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close