राणे किस झाड की पत्ती – शिवसेना

April 16, 2015 11:46 AM0 commentsViews:

uddhav thackray

16  एप्रिल : शिवसेनेच्या विरोधात कोणी कितीही वल्गना आणि गर्जना केल्या तरी शिवसेनेच्या वाघासमोर भलभले पडले आहेत. मग राणे हे किस झाड की पत्ती, ही पत्तीही पाचोळ्यासारखी उडून गेली अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवारी) सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला आहे. नारायण राणेंनी वांद्र्यातील निवडणुकीत पैसा ओतूनही त्यांना पराभव सोसावा लागला असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

मातोश्रीच्या अंगणात पार पडलेल्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करत विजय मिळवला. यानंतर गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना चिमटे काढले. श्रद्धा आणि निष्ठेची पूजा करणार्‍यांसाठी मातोश्री हे अंगण आहे, पण अंगावर येणार्‍या बेइमानांसाठी हे अंगण नसून रणमैदान आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला.

‘नारोबा सारख्या लोकांचा पराभव शिवसेना कुठेही करु शकते. शिवसेनेने नारायण राणेंचा कुडाळमध्ये 10 हजार मतांनी आणि आता वांद्र्यात 20 हजार मतांनी पराभव केला. पुढच्या निवडणुकीत हे महाशय तिप्पट मतांनी पडतील अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close