वांद्रे पूर्वच्या सामन्यानंतरचे ‘प्रहार’

April 16, 2015 6:59 PM0 commentsViews:

16  एप्रिल : वांद्रेच्या निकालानंतरही शिवसेना आणि राणे कुटुंबियांमधला सामना सुरूच आहे. निकालानंतर आम्हाला हिणवणार्‍या शिवसैनिकांच्या घरचे पत्ते आम्हाली देखील माहित असा गर्भित इशाराच नितेश राणेंनी शिवसेनेला दिला आहे. नितेश राणेंनी आज IBN लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसैनिकांना हा इशारा दिला आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा 19 हजार मतांनी दारूण पराभव केला. नारायण राणेंसाठी आमदारकीचा राजीनामा देणार का असा प्रश्न विचारल्यास नितेश राणेंनी आपण वडिलांसाठी आमदारकीचा राजीमाना नेहमीच खिशात घेऊन फिरत, असं म्हटलं आहे. एमआयएमवर एमडी ड्रगचं रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोपही नितेश राणेंनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close