राज्यात 60 टक्के मतदान

October 13, 2009 2:09 PM0 commentsViews: 9

13 ऑक्टोबर मुंबईत 50 टक्के तर महाराष्ट्रात 60 टक्के मतदान झाल्याची महिती मुख्य निवडणुक आयुक्त नवीन चावला यांनी दिली. अहेरी आरमोरी भागातील 22 मतदान केंद्रावर मतदान झालच नसल्याची माहिती त्यांनी दिली. या भागातल्या मतदाना विषयी मंगळवारी निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावे सांगितलं. तसंच नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या काही भागांमध्ये फेरमतदान घेणार असल्याचं मुख्य निवडणुक आयुक्त नवीन चावला यांनी स्पष्ट केलं आहे.राज्यातील निवडणुक प्रक्रिया वेळेत पार पडली असून काही ठीकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच सॅटेलाईट फोनचा वापर करण्यात आल्याची माहिती मुख्या निवडणुक आयुक्त नवीन चावला यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच नक्षलग्रस्त भागात संरक्षण मंत्रालयाने हेलिकॉपटर्सची मदत दिली होती. किनार पट्टीवरील संरक्षणाकडेही पूर्ण पणे लक्ष पूरवलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

close