कॅनडात पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत

April 16, 2015 8:53 PM0 commentsViews:

16  एप्रिल : आपल्या युरोपवारीनंतर कॅनडात गेलेले पंतप्रधान मोदींनी टोरंटोला पोचलेत. भारतीय प्रमाणवेळे आज पहाटे मोदींनी टोरंटोमध्ये भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकांच्या मेळाव्यात भाषण केलं. टोरंटोमधल्या रिको कॉलिझियम मध्ये हे भाषण झालं.कालच्या दिवशी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचं सर्वात मोठं फलित म्हणजे कॅनडने पुढच्या पाच वर्षांसाठी भारताला युरेनियम देण्याचं मान्य केलंय. गेल्या 42 वर्षांत कॅनडाला भेट देणारे मोदी ह पहिलेच पंतप्रधान आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close