डोंबिवलीत फी वाढीविरोधात विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर

April 17, 2015 1:12 PM1 commentViews:

16  एप्रिल : डोंबिवलीतील रॉयल इंटरनॅशनल स्कूलने भरमसाठी फी वाढ केली असून शाळा प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात शाळेतील विद्याथच् व पालकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. वाढीव फी न भरणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार नाही अशी धमकीच शाळा प्रशासनाने दिली असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

डोंबिवलीतील ‘रॉयल इंटरनॅशनल स्कूल’मध्ये सध्या पहिलीची फी 20 हजार रुपये ऐवढी आहे. पण आता शाळा प्रशासनाने ही फी 20 वरुन थेट 26 हजार रुपयांवर नेली आहे. या भरमसाठ फी वाढीनंतर काही पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे धाव घेतली. मुख्यमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालकांनी शाळेचे ट्रस्टी रजनीकांत शहा यांच्याकडे गा-हाणे मांडले. पण शहा यांनी पालकांच्या तक्रारीकडे फारसे लक्ष दिलं नाही. याऊलट मी 6 कोटी रुपये खर्च करुन शाळा उभी केली आहे. आता तुम्हाला वाढीव फी द्याववीच लागेल, नाहीतर पुढील वर्षासाठी मुलांना प्रवेश देण्यात येणार नाही असं मुजोर उत्तर शहा यांनी दिलं.

त्यानंतर, आधी शाळेत पालक शिक्षक संघ स्थापना करा मग आम्ही फी देऊ अशी मागणी पालकांनी केली. पण शिक्षक पालक संघ स्थापन करणार नाही जे करायंचय ते करा. ही शाळा सरकारी नसून खासगी आहे असं सांगत त्यांना पालकांना हाकलून लावलं. शाळेत शिक्षक पालक संघ नसल्याची कबुली मुख्याध्यापकांनी दिली असली तरी या वादावार प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं आहे. महाराष्ट्र शिक्षण कायद्यानुसार शाळेत पालक शिक्षक संघ स्थापन करणं गरजेचं असून हा संघ स्थापन करुन नियमाप्रमाणेच फी वाढ करावी. मगच आम्ही फी भरु अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikram

    शाह साहेबांनी सहा कोटी खर्च केले आहेत त्या मुळे त्यांना पालकांचा पैसा खेचायचा अधिकार आहे … त्यात ते शाह आहेत त्यामुलेय BJP सरकार काही करणार नाही

close