डान्सबारमध्ये छमछम करणारे दोन्ही पोलीस निलंबित

April 17, 2015 8:43 PM0 commentsViews:

17  एप्रिल : डोंबिवलीमधल्या एका अनधिकृत डान्स बारमध्ये छमछम करताना चक्क पोलीस कर्मचारीच सापडले आहेत. हे दोन पोलिस तिथल्या बारबालांशी अश्लील चाळे करतानाची व्हिडीओ क्लिपसमोर आली असून या प्रकारामुळे पोलिसांची अब्रू पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहे.

डोंबिवलीतील कल्याण-शिळ रोडवर सोनारपाडा गावाजवळ ‘इंद्रप्रस्थ’ नावाचा लेडीज बार आहे. लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली रात्री या बारचं रुपांतर रात्री डान्स बारमध्ये होतं. रविवारी पोलिसांनी या बारवर धाड घातली, त्यावेळेस हे दोन्ही पोलीस इथे सापडले.

दरम्यान, पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्याऐवजी त्यांची मानपाडा पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँचमधून थेट पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. संजय बाबर आणि रशीद मुलाणी अशी या पोलिसांची नावं आहेत. दरम्यान, या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close