इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास 20 रुपये सर्व्हिस टॅक्स

October 14, 2009 10:02 AM0 commentsViews: 5

14 ऑक्टोबर गुरुवारपासून इतर कोणत्याही बँकेच्या एटीएमवरून केलेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 20 रुपयांचा सर्व्हिस टॅक्स द्यावा लागेल. यात पहिल्या पाच ट्रान्झॅक्शनसाठी चार्जेस लावले जाणार नाहीत. पण त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी चार्जेस लावले जातील. तसेच दुसर्‍या बँकेच्या एटीएमवरून दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम एकाच दिवशी काढता येणार नाही. सध्या इंटर-बँक चार्जेस ग्राहकांना लावले जात नाहीत तर ते एका बँकेकडून दुसर्‍या बँकेला दिले जातात. मात्र अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स जास्त प्रमाणात वाढल्यामुळे बँकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहा हजार रुपयांपेक्षा जास्त गरज असणार्‍या ग्राहकांना यापुढे स्वत:च्याच बँकेचं एटीएम शोधण्याची धडपड करावी लागणार आहे.

close